- चिनी कुत्र्याचे नाव काय ?
- >हे हुंग ते हुंग
- भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
- >हिंदुस्तान लिव्हर
- नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत ?
- >कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
- रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
- >उभा का बस की
- हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
- >कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
- अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
- >वर्षा अ खेर
- हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
- >ओला होईल
- ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
- >माऊ ली
- त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
- >थोर ली
- लहान बहिणीचे नाव काय ?
- >धाक ली
- जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
- >घड्याळ दुरुस्त करण्याची !
- दोन चिमण्या असतात त्यातली एक म्हणते "चिऊ" दुसरी काहीच म्हणत नाही! का?
- >कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
- कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
- >कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
- ढिशुम ढिशुम: एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
- >कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....
- रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
- कारण लहानपणी ..
- >रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..
- पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
- >दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
- संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
- >संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''
- पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
- >मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
- नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?
- >कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना
Monday, 4 March 2013
P J
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment