Friday, 29 March 2013

Wow.......













Wednesday, 27 March 2013

Websites In MARATHI ?


या Websites ना मराठीत काय म्हणाल  ? 
Facebook.com – थोबाड वही,
Twitter.com – चिवचिवाट,
Youtube.com – तू नळी,
Orkut.com – किव्वा कुटा,
Yahoo – या (बरं का) हो,
Hotmail.com – गरम पोस्ट,
Linkedin.com – जोडलेले राहा,
Rediff.com – लाल जर,
Amazone.com – अम्माचे क्षेत्र,
Tumblr.com – तम्बरेल (लोटा),
Delicious.com – चविष्ट,
Blogspot.com – कथा (कुटायचे) ठिकाण,
Myspace.com – माझी जागा,
DeviantART.com -देवी मुंगी (ची) कला,
Rapidshare.com – फटाफट वाटा,
Megavideo.com – दीर्घ चित्रफीत,
Playlist.com – यादी वाजवा..

Joke: Marathi Exam Paper- Question-Answer



अ) १ ) …. थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.
प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
ब ) १ ) प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे २ उदाहरणसांगा ?
उत्तर १ – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
उत्तर २ – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्खनसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्खनसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.
क ) १ ) अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ….
प्रश्न – देखा है पहली बार ……………
उत्तर – उद्धव के घरमे पवार… कसके पकड़, कसकेपकड़.
प्रश्न – पाण्यातला मासा झोप घेतो कैसा…………
उत्तर – खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
ड) व्याख्या करा .
१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर – अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.
२) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.
क ) १) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -
…….. काय झालं ?
…….. बाळ रडत होतं.
…….. एक कानशिलात दे त्याच्या.
…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.
ख ) १ ) अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….
प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब……………
उत्तर – नालायक है.
प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.

Monday, 4 March 2013

P J


  • चिनी कुत्र्याचे नाव काय ?
  • >हे हुंग ते हुंग

  • भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
  • >हिंदुस्तान लिव्हर

  • नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
  • >कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.

  • रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
  • >उभा का बस की

  • हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
  • >कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

  • अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
  • >वर्षा अ खेर

  • हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
  • >ओला होईल

  • ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
  • >माऊ ली

  • त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
  • >थोर ली

  • लहान बहिणीचे नाव काय ?
  • >धाक ली

  • जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
  • >घड्याळ दुरुस्त करण्याची !

  • दोन चिमण्या असतात त्यातली एक म्हणते "चिऊ" दुसरी काहीच म्हणत नाही! का?
  • >कारण दुसरी चिमणी Factory ची असते.

  • कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
  • >कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

  • ढिशुम ढिशुम: एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
  • >कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....

  • रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
  • कारण लहानपणी ..
  • >रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..

  • पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
  • >दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!

  • संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
  • >संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''

  • पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
  • >मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.

  • नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?
  • >कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना

मजेशीर - व्याख्या

  • अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
  • मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
  • शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
  • सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
  • वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
  • लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
  • फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
  • पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
  • गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
  • लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
  • छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
  • कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
  • परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
  • परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
  • विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
  • दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
  • थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
  • काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
  • नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
  • घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
  • मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
  • ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
  • विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
  • विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
  • श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
  • श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
  • IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
  • IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
  • बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
  • स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
  • चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
  • लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना