Tuesday, 16 October 2012

आम्ही अशा देशात राहतो!





आम्ही अशा देशात राहतो!...............................

जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,
जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,
जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,
जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो,मात्र तीच रक्कम दान नाही करत,
जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,
जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,
जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,
जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी"वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा
करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे".. 

आणि नंतर आवाज देतात...."छोटु....दोन चहा घेऊन ये...!"



No comments:

Post a Comment